05/07/2025
10022403281002240178Picsart_25-05-23_23-23-40-978Picsart_25-05-12_18-07-06-196

अंबरनाथ शहरातील छत्रपती* *शिवाजी महाराज चौकातील मुजोर* *रिक्षा चालकांचा कायमस्वरूपी बंदोबस्त* *

0
IMG-20240623-WA0584

*अंबरनाथ शहरातील छत्रपती* *शिवाजी महाराजचौकातील मुजोर* *रिक्षा चालकांचा कायमस्वरूपी बंदोबस्त* **कधी* *होणार .*असा प्रश्न स्थानिक नागरिक* *आणि रिक्षा चालक* *मालक*विचारत आहेत**

*आयडियल इंडिया न्यूज*

*रिपोर्टर आशिष देशपांडे* *अंबरनाथ मुंबई*

 

अंबरनाथ शहर रेल्वे स्टेशन लगतचा परिसर हा अगदी छोटा पडत असून छत्रपती शिवाजी महाराज चौक चा संपूर्ण परिसर हा हातगाड्या फेरीवाले यांनी व्यापून टाकला असून नगरपालिकेच्या आशिर्वादा मुळे फुटपाथवर बे धडक कब्जा केल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असून त्याच परिसरात प्रवासी भाडे भरणार्या अनलिगल रिक्षा वाढत आपल्या मनमर्जीने प्रवासी भाडे भरण्याचे उघड प्रकार सुरू असून त्यांच्या अशा बेताल वागण्याने स्टेशन परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

अंबरनाथ शहरातील अनेक प्रवासी हे रेल्वेने प्रवास करतात एखादी रेल्वे गाडी अंबरनाथ शहरात भरून आल्यावर त्या रेल्वे गाडी मधील हजारोंच्या संख्येने नागरिक उतरतात त्या मुळे अंबरनाथ शहरातील पूर्व आणि पश्चिम ह्या दोन्ही स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते त्यातच अंबरनाथ शहरातील रिक्षा चालकांचा वाढता मुजोरीपणा कायमच समोर येत असतो .

अंबरनाथ शहरात रात्रीच्या वेळेस स्टँड सोडून प्रवासी भाडे घेणारे हे रिक्षा चालक बाहेरच भाडे घेण्याचे कार्य करतात त्या मुळे रांगेत रिक्षा व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालक मालक यांच्या व्यवसायावर परिणाम होतो. कायद्याचे उल्लंघन करणारे रिक्षा चालक मालक जागच्या जागीच टन घेऊन रिक्षा फिरवतात व भाडे भरतात त्या मुळे इतर प्रवाशांना रांगेतच थांबून राहावे लागत असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांनवर कारवाई करणे अत्यंत आवश्यक असून त्यांच्या वर कायमस्वरूपी कारवाई कधी होणार असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.

अंबरनाथ शहरातील रिक्षा चालक मालक यांच्याशी संपर्क साधला असता बिना लायसन्स बॅच वर्दी चे पालन न करणाऱ्या तसेच स्क्रॅप रिक्षांचा बंदोबस्त कधी होणार वाहतूक पोलीस चिरीमिरी घेऊन त्या अनलिगल वाहनांना जो आशिर्वाद देण्याचे कार्य करतात ह्या गोष्टी चा कायमस्वरूपी बंदोबस्त कधी होणार असा प्रश्न रांगेत रिक्षा व्यवसाय करणारे रिक्षा चालक मालक विचारत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed