06/07/2025
10022403281002240178Picsart_25-05-23_23-23-40-978Picsart_25-05-12_18-07-06-196

सुलोचनाताई पवार आयोजित चेन्नई येथे मसाला उद्योग प्रशिक्षण शिबिर नुकतेच घेण्यात आले

0

आइडियल इंडिया न्यूज़

विद्या मोरे  ,कराड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हा बाळासाहेबांची शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने सुलोचनाताई पवार आयोजित चेन्नई येथे मसाला उद्योग प्रशिक्षण शिबिर नुकतेच घेण्यात आले या शिबिरास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
मसाल्यांचा वापर ते मसाले तयार करण्यापासून पॅकिंग पर्यंत प्रशिक्षण या शिबिरात देण्यात आले.

 

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडीच्या सातारा उपजिल्हाप्रमुख सुलोचनाताई पवार यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर उत्साहात पार पडले 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान हे शिबिर संपन्न झाले सदर शिबिरात महिलांनी त्याठिकाणी महाराष्ट्रातील महिलांनी सहभाग नोंदवला मसाला उद्योग करण्यासाठी आवश्यक ती माहितीही यावेळी तज्ञ मार्गदर्शकांकडून देण्यात आली तसेच काही मसाले देखील यावेळी प्रत्यक्षरित्या महिलांना
तयार करून दाखवण्यात आले त्याचे पॅकिंग कसे करायचे याची माहिती देखील यावेळी देण्यात आली
कराड दक्षिण विधानसभा उपजिल्हाप्रमुख विद्याताई शिंदे, तसेच कल्पनाताई शामराव पवार (शाखाप्रमुख, गोटे), इरा रजपूत (शाखाप्रमुख गोटे) पुनम गव्हाणे, कमल दाईंगडे , सीमा खराडे, नाकुषा कचरे आदी महिला पदाधिकारी, व शिवसैनिक देखील त्याठिकाणी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed