आशिर्वाद सूतगिरणीच्या चेअरमन पदी कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील* व्हा. चेअरमन पदी प्रमोद सोनार यांची निवड

आशिर्वाद सूतगिरणीच्या चेअरमन पदी कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील* व्हा. चेअरमन पदी प्रमोद सोनार यांची निवड

आइडियल इंडिया न्यूज़

पाचोरा *(आबा सूर्यवंशी)*

पाचोरा तालुक्या सह परिसरातील सहकार चळवळीला पुन्हा नव्याने गतवैभव प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने पाचोरा – भडगांव मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून आशीर्वाद सूतगिरणीची स्थापना करण्यात आली. नुकतीच या सूतगिरणीच्या नूतन संचालक मंडळाची बैठक दिं. ३० मार्च शनिवार रोजी संस्थेच्या कार्यालयात पार पडली झाली. सूतगिरणीचे १८ सदस्यीय संचालक मंडळाने आगामी पाच वर्षांसाठी चेअरमन पदी आ. किशोर आप्पा पाटील तर व्हाईस चेअरमन पदी गजानन उद्योग समूहाचे संचालक प्रमोद सोनार यांची बिनविरोध निवड केली आहे. यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे दीपक खांडेकर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते.संस्थेने सुमारे तीन कोटी रुपयांचे भागभांडवल उभे केले असून लवकरच शासनाकडून जागा खरेदी उभारणीसाठी अनुदान प्राप्त होणार आहे .यासाठी पाचोरा तालुक्यात विस्तीर्ण अशी जागा खरेदी करून या

सूतगिरणीच्या कामाला प्रारंभ होणार आहे.यामुळे पाचोरा- भडगाव सह परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना मोठी मदत मिळणार तर परिसरातील सुमारे एक हजार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. मतदारसंघात सूतगिरणीच्या निर्माणाला चालना मिळाल्याने आनंद व्यक्त आहे. संचालक मंडळात नरेंद्र उत्तम पाटील,रावसाहेब मनोहर गिरधर पाटील, डॉ. भरत लाला पाटील, विजय मेघराज पाटील,रितेश सुरेशचंद्र ललवाणी, रवींद्र कैलास केसवाणी,राजेंद्र धनसिंग पाटील, संजय सिसोदिया,मनोज शांताराम पाटील, गणेश भिमराव पाटील, विनोद रमेश ललवाणी, चंद्रकांत रंगराव धनवडे, जितेंद्र चंपालाल जैन, संगीता राजेंद्र पाटील, दिलीप बद्रिलाल मोर, सुमित किशोर पाटील,आश्विनी विजय पाटील,सुनीता किशोर पाटील यांची संचालक पदी निवड झाली आहे. या वेळी स्विय सहाय्यक राजेश पाटील, विष्णु चौधरी, प्रविण पाटील ,संदीप पाटील तसेच वस्त्रोद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed