आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाहनाला किरकोळ अपघात झाला असून यात त्यांना मुका मार लागल्याचे वृत्त आहे.

आइडियल इंडिया न्यूज़
मुक्ताईनगर-सुभाष सनांन्से
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाहनाला किरकोळ अपघात झाला असून यात त्यांना मुका मार लागल्याचे वृत्त आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, आमदार चंद्रकांत पाटील हे कुंड येथून मुक्ताईनगरकडे येत असतांना त्यांच्या वाहनाला ताफ्यातील पोलीस वाहनाने मागून टक्कर दिली. यात आमदार पाटील यांच्या वाहनाचे मागील बाजूने तर पोलीस वाहनाचे पुढील बाजूने थोडे नुकसान झाले.
दरम्यान, या अपघातामध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांना कोणतीही इजा झालेली नाही. तथापि, त्यांच्यासह दोन पोलिसांना थोडा मुका मार लागला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रूग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली आहे. या अपघाताची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांनी रूग्णालयाकडे धाव घेतली आहे.