वीडियो न्यूज़*****महायुती लोकसभेच्या उमेदवार सौ.स्मिताताई वाघ यांच्या प्रचार रॅलीला मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद*—————–

*महायुती लोकसभेच्या उमेदवार सौ.स्मिताताई वाघ यांच्या प्रचार रॅलीला मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद*————–

उमेदवार सौ. स्मिताताई वाघ यांनी महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून केली रॅलीची सुरुवात —

शिवसेना आ .किशोर आप्पा पाटील, राष्ट्रवादी चे माजी आ. दिलीपभाऊ वाघ, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, मनसे, आरपीआय , रासप महायुती घटक पक्षांच्या शेकडो पदाधिकारी , कार्यकर्त्यांचा रॅलीत सहभाग !

आइडियल इंडिया न्यूज़

(जळगाव जिल्हा प्रतिनिधि)

*आबासाहेब सुर्यवंशी*

 

वीडियो देखें

लोकसभेच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत तशी महायुतीच्या उमेदवार सौ. स्मिताताई वाघ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. पाचोरा – भडगांव मतदासंघात महायुतीच्या प्रचाराची धुरा राजकारणाच्या आखाड्यातील मुत्सद्दी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या मार्गदर्शनात तर, राजकारणात चांगलेच तरबेज झालेले आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या आणि युवानेता म्हणून राजकारणाच्या मैदानात उतरलेले अमोल शिंदे यांच्या खांद्यावर आहे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचाराची कमान मतदासंघांत भविष्यातील राजकीय पर्याय म्हणून मैदानात उतरलेल्या ऊबाठा शिवसेनेच्या नेत्या सौ.वैशालीताई सूर्यवंशी , स्व.माजी आमदार आप्पासाहेब ओंकार वाघ यांच्या तालमीत तयार झालेले पिटीसी शिक्षण संस्थेचे कार्यकुशल चेअरमन नानासाहेब संजय वाघ, महाविद्यालयीन अवस्थे पासून जिल्हा, राज्य, आणि देश पातळीवर संघटनात्मक कार्यात निपुण आणि राजकीय वारसा असलेले राष्ट्रिय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या हाती मशाल देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवारांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मतदासंघात घरोघरी जावून आपापल्या पक्षांची भूमिका, कार्य मतदारांना समजावून देशाच्या हितासाठी आमचाच पक्ष, उमेदवार हाच पर्याय असून येणाऱ्या १३ मे शुक्रवार रोजी मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन करीत आहे.

 

महायुतीच्या उमेदवार सौ.स्मिताताई वाघ आणि महविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्यात प्रचाराची स्पर्धा शिगेला पोहोचली आहे. जुना एरंडोल तर आताचा जळगाव लोकसभा मतदासंघ हा गेल्या पाच ते सहा पंचवार्षिक पासून भारतीय जनता पक्षाचा गड असल्याने भाजपची २०२४ ची ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि पंतप्रधान मोदींच्या चारशे पारच्या आकडेवारीत मोडणारी आहे . तर दुसरीकडे महाविकास आघाडी भाजपचा हा गड काबीज करण्यासाठी सरसावली आहे.

येणाऱ्या ४ जूनच्या मतमोजणीत जळगाव, आणि रावेर लोकसभा जिंकणे भारतीय जनता पक्षाच्या भविष्यातील राजकीय गणितातील बेरीज – वजा बाकीची ठरणार आहे. महाविकास आघाडीची देखील या दोन्ही जागा भाजप उमेदवारांचा पराभव करून आपल्या कडे ओढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.

दिनांक ४ एप्रील शनिवार रोजी महायुतीच्या उमेदवार सौ. स्मिताताई वाघ यांनी सकाळी दहा वाजता भडगांव रोडवरील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकातील शिवशंभू प्रतिमेला, त्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा, स्टेशन रोडवरील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकातील प्रतिमा आणि घटनाकार ,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यारपण आणि अभिवा दन करून ढोल ताशांच्या गजरात, प्रचार वाहने घेवून पूर्ण शहरातील मतदारांशी संवाद साधत देशहितासाठी, देशाला महासत्तेकडे नेण्या साठी आणि सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासा साठी कमळ विजयी करण्याचे आवाहन केले, रॅलीत आमदार आप्पासाहेब किशोर पाटील , माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, उपजिल्हा प्रमुख किशोर बारवकर, बाजार समिती सभापती गणेश पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, याचें सह ,भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, समर्थक पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उपनगराध्यक्ष बंडू चौधरी,शरद पाटे, माजी नगराध्यक्षा सौ. सूनिताताई पाटील, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अभिलाषा रोकडे, सदाशिवआबा पाटील, मधुकर काटे, माजी सभापती सुभाष पाटील, निवडणूक प्रबंधक सुनिल पाटील, दत्ता बोरसे पाटील, हिम्मतसिंग निकुंभ, नंदुबापू सोमवंशी, रवी पाटील, प्रदीप आमदार स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रविण पाटील, दिपक माने, समाधान मुळे, गोविंद शेलार, डॉ .नीळकंठ पाटील,शिवदास पाटील, भगवान मिस्तरी, सुदर्शन महाजन, रिंकू जैन , याचें सह मनसे, आरपिआय , रासप सर्व पक्षीय शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *