05/07/2025
10022403281002240178Picsart_25-05-23_23-23-40-978Picsart_25-05-12_18-07-06-196

वीडियो न्यूज़ — विधानसभा निवडणूक संदर्भात विरोधकांकडून राजकीय संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न -माजी आ.दिलीप वाघ

0
IMG-20240714-WA0523

विधानसभा निवडणूक संदर्भात विरोधकांकडून राजकीय संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न -माजी आ.दिलीप वाघ

*मतदार संघात सुरू असलेले स कार्पोरेट राजकारण घातक*

*२२ ऑगस्टला पुढील राजकीय भूमिकेची घोषणा*

*टायगर अभी जिंदा हैl

*रिपोर्टर – लक्ष्मण आबा सूर्यवंशी*(जिल्हा प्रतीनिधी)

वीडियो देखें

– पाचोरा – भडगांव मतदासंघांत सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे कार्पोरेट राजकारण सुरू आहे. असे राजकारण मतदारसंघांला परवडणारे नाही.यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता राजकारणात येवू शकत नाही. अश्या कार्पोरेट राजकीय परिस्थितीत स्वार्थ आणि पैशाला बळी पडणारे हाडाचे पदाधिकारी उपकार विसरून अश्या राजकारणाला बळी पडत असून काही पदाधिकारी राजकीय सुपारी घेवून गावांमध्ये राजकीय. काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. मतदारसंघात विरोधक माझ्या बाबत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात राजकीय सेटलमेंट झाल्याचे गैरसमज पसरवित आहे. दोन महिन्यानंतर सप्टेंबर – ऑक्टोबर मध्ये होणारी विधानसभा निवडणूक लढवि्यासाठी पाचोरा – भडगांव कार्यकर्त्यांची लवकरच बैठक घेणारअसून येत्या २२ ऑगस्ट रोजी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी विधानसभा निवडणूक कोणत्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने लढविणार याची निर्णायक घोषणा करणार असल्याचे पाचोरा – भडगांव मतदारसंघांचे रा.काँ.चे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी दि.१४ जुलै रविवार रोजी त्यांचे मूळगाव राणीचे बांबरुड येथील शेतात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट करून मतदासंघांच्या राजकारणात *टायगर अभी जिंदा* असल्याचा संदेश मतदार आणि विरोधक राजकारण्यांना दिला आहे.

या प्रसंगी न.पा.माजी गटनेते संजय वाघ, विनय जकातदार व्ही टी. जोशी ,भडगांव तालुकाध्यक्ष हर्षल पाटील,श्याम भोसले, माजी सभापती दगाजी वाघ, एन.सी.पाटील, जिल्हा पदाधिकारी शालिग्राम मालकर, प्रा.भागवत महाल पुरे, खलिल देशमुख, प्रा. सुभाष तोतला,भोला आप्पा चौधरी ,ललित वाघ, भूषण वाघ, रणजित पाटील, विजय पाटील, वासुदेव महाजन, शिवदास पाटील, शशिकांत चंदीले ,अशोक पाटील, विनोद पाटील, अभिलाषा रोकडे, नम्रता पाटील, ऍड. आविनाश सुतार, पि.डी.भोसले, विकी पाटील, सूरज वाघ,गौरव वाघ , महेश माळी, बी.एम.पाटील, बाबाजी ठाकरे, पिंटू भामरे, शशिकांत वाघ, रमेश पाटील, रविंद्र महाजन, किशोर पाटील संजय पाटील, अमोल बाविस्कर, महेंद्रसिंग पाटील, बुरहान तडवी, कालिदास पाटील, निलेश पाटील, गोपी पाटील, राज जगताप आदींसह पाचोरा – भडगांव तालुक्यातील रा.काँ.चे जिल्हा, तालुका, शहर पातळीवरील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकिय पक्ष सज्ज झाले असून शहर ग्रामीण भागात भारतीय जनता पक्ष, शिंदे सेनेचे आमदार किशोर पाटील व उबाठा शिवसेनेच्या वैशाली सूर्यवंशी , शरदचंद्र पवार आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणूक लढविण्याच्या संद र्भात माजी आमदार दिलीप वाघ हे राष्ट्रवादीच्या नेमक्या कोणत्या गटा कडून विधानसभा लढविणार की ! विधानसभा निवडणूक लढणारच नाही, त्यांची ही पुढील भूमिका अद्याप समोर आलेली नव्हती. त्यामुळे त्यांचेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते बुचकळ्यात पडले होते. कारण दिलीप वाघ हे मागील राजकीय वाटचालीत महाविकास आघाडी सोबत शरदचंद्र पवार गटात आणि सत्तांतर झाल्यानंतर अजितदादा पवार यांचे ही संपर्कात आहेत. त्यांचे लहान बंधू संजय वाघ आणि काही पदाधिकारी हे लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सोबत शरदचंद्र पवार गटात प्रचारात सक्रिय होते. त्यामुळे देखील मतदार संघाच्या राजकीय पटलावर माजी आमदार दिलीप भाऊ वाघ हे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काय खेळी खेळणार याचा अंदाज येत नव्हता. मात्र पाचोरा- भडगांव तालुक्याच्या राजकरणात आमदारकीची प्रचंड वाढलेली स्पर्धा आणि वाघ घराण्याची राजकीय चुप्पी लक्षात घेवून माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी अखेर दि.१४ जुलै रविवारी पत्रकार परिषद घेवून पुढील काळातील राजकीय भूमिका मांडली. या वेळी त्यांनी विरोधक पैश्याच्या जोरावर कार्पोरेट राजकारण करीत आहेत. तसेच दिवसेंदिवस मतदारसंघांत वैचारिक, राजकीय दर्जा घसरत असल्याचा खेद व्यक्त केला. विरोधकांकडून मी नगरपालिकेचे नेतृत्व सांभाळणार असून आमदारकीच्या निवडणुकित मदत करणार असल्याच्या अफवा, चर्चा आणि गैरसमज पसरविले जात आहे. वाघ घराणं गतकाळात ६७ वर्षां पासून राजकारण करीत असून आप्पासाहेबांनी अनेकांना राजकिय आणि विविध प्रकारचे लाभ दिले. त्यांचे नंतर मी सार्वजनिक राजकारणात आप्पांचे कार्य पुढे नेत आहे .हे करतांना कार्यकर्त्यांवर उपकार केल्याचे बोलणे आमच्या स्वभावात नाही. मी तडजोडीचा शब्द दिला असल्याचा विपर्यास विरोधक गावागावात जावून करीत आहेत. मी अश्या प्रकारचा कोणताही शब्द दिलेला नाही. मी मागील काळात वीस वर्ष नगरपालिकेच्या सत्तेत काम केले आहे. वाघ परिवाराला अश्या प्रकारच्या राजकारणाची गरज पडली नाही. मतदारसंघांत विरोधकांकडून होत असलेला अपप्रचार आणि मी कोणत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस वतीने आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा २२ ऑगस्ट होणाऱ्या वाढदिवसाच्या दिवशी करणार असल्याचे माजी आ. दिलीपभाऊ वाघ यांनी प्रसार माध्यमांच्या वतीने गैरसमज आणि संभ्रमाच्या राजकिय वातावरणाला एकप्रकारे विराम दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed