05/07/2025
10022403281002240178Picsart_25-05-23_23-23-40-978Picsart_25-05-12_18-07-06-196

आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनची बुऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) येथे 25 रोजी बैठक संपन्न

0

आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनची बुऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) येथे 25 रोजी बैठक संपन्न

Rahul Khanderao

बुऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) – आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनची बैठक दि 25/9/22 रोजी मध्यप्रदेश येथील बुऱ्हाणपूर येथे संयुक्त भारत प्रभारी श्री अजयकुमार मिश्र यांच्या अध्यक्षतेखाली व संयुक्त केंद्रीय सचिव आबासाहेब सूर्यवंशी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव सूर्यकांत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी संपन्न झाली.


सर्वप्रथम रेल्वेस्थानक व कार्यक्रम स्थळी अजयकुमार मिश्र, आबासाहेब सूर्यवंशी, सूर्यकांत कदम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अमरावती जिल्हा अध्यक्ष रशीद खान, बुऱ्हाणपूर जिल्हा अध्यक्ष राहुल खंडेराव आदी पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते. आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन (ऑल इंडिया पत्रकार संघटना) ला 21 वर्ष पूर्ण होऊन संघटना 22 व्या वर्षात पदार्पण करीत असल्याने संघटनेचे 22 वे देशव्यापी अधिवेशन बुऱ्हाणपूर येथील धारणी (चिखलदरा महाराष्ट्र) येथे 16 ऑक्टोबर रोजी होणार असल्याने याची सविस्तर चर्चा यावेळी करण्यात येऊन अजयकुमार मिश्र, आबासाहेब सूर्यवंशी, सूर्यकांत कदम यांनी मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली.

याप्रसंगी अमरावती जिल्हा अध्यक्ष रशिद खान, मध्यप्रदेश बुरहानपुर जिल्हा अध्यक्ष राहुल खांडेराव, जिल्हा उपाध्यक्ष राजु जामंबेकर, जिल्हा महासचिव वाहिद अलि, तालुका अध्यक्ष विलास राठोड, तालुका उपाध्यक्ष मनिष दायमा, जिल्हा कोषाध्यक्ष रूपेश वर्मा, धारनि तालुका अध्यक्ष अजहर खान आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी बुरहानपुर जिल्हा सल्लागार समिती सदस्य पदी डॉ, चंद्रशेखर बंड यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी आयडियल जनरलिसट असोसिएशन चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed