वाहतूक उपशाखा कल्याण येथील* *अधिकारी राजेश शिरसाठ* *यांनी वाहन धारकांना* *दि.27 जूलै 2024 रोजी पर्यंत* *वाहनांन वरिल इ चलन दंडाची* *रक्कम कमी करण्यात येणार* *असल्याचे केले जाहीर*

*वाहतूक उपशाखा कल्याण येथील* *अधिकारी राजेश शिरसाठ* *यांनी वाहन धारकांना* *दि.27 जूलै 2024 रोजी पर्यंत* *वाहनांन वरिल इ चलन दंडाची* *रक्कम कमी करण्यात येणार* *असल्याचे केले जाहीर*
आयडियल इंडिया न्यूज
रिपोर्टर देशपांडे अंबरनाथ मुंबई
कल्याण शहर वाहतूक उपशाखा येथील अधिकारी राजेश शिरसाठ यांच्या तर्फे सर्व वाहन चालकांना आवाहन करण्यात आले दिं.27 जुलै 2024 रोजी माननीय न्यायालय कल्याण शहर येथे राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये कसुरदार वाहन चालकांच्या तडजोड शुल्क मध्ये काही प्रमाणात सुटू देऊन त्यांच्या वरील दंडाची रक्कम कमी करण्यात येणार आहे व दंड भरल्यावर असे चलान निकाली काढण्यात येणार आहेत.तरी ज्या वाहन चालकांना आपल्या वाहनावरील इ चलन दंडाची रक्कम कमी करून शासन दरबारी भरावयाची असेल अशा वाहन चालकांनी दिनांक 20 जुलै 2024 पूर्वी शहर वाहतूक उपशाखा कल्याण येथील कार्यालयात संपर्क साधावा नंतर येणाऱ्या वाहन चालकांचा विचार करण्यात येणार नसल्याचे वाहतूक उपशाखा कल्याण येथे भेट दिली असता वरील माहिती देण्यात आली.