*पुन्हा एकदा मिल्की बार धबधबा अपघात*
*पुन्हा एकदा मिल्की बार धबधबा अपघात*
आइडियल इंडिया न्यूज़
राजू पाटिल, पुणे
दिनांक 27/06/2024 दुपारी दोन वाजता पौंड पोलीस स्टेशनवरुन फोन आला. मिल्की बार धबधबा येथे एक मुलगा बुडाला आहे.
टिम जुळवाजुळव केली, या ठिकाणी याच महिन्यात तीन तारखेला एक मुलगा बुडाला होता. पाऊस चालू होण्यापूर्वी व आज पावसाने सुरुवात केली आणि अपघात झाला यात फरक होता.
आता धबधबा जोरात चालू होता.पाऊस चांगला जोरात पडत होता. पाच मित्रांच्या बरोबर आदेश जितेंद्र पवार, सध्या शिक्षणासाठी पुण्यात व मुळचा जळगाव हा पोहता पोहता धबधबा पडतो त्या ठिकाणी गेला व पाण्याखाली काही वेळ दिसेनासा झाला व नंतर त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे लक्षात आले.
भरकटलेल्या तरुणांई ला एकच कळकळीची विनंती आहे कि एखाद्या जागा बघायला जाता तर जा फोटो काढा व्हिडिओ काढा, निसर्गाचा आनंद लुटा .पण नको ते धाडस करू नका . पाण्याचा मोह टाळा, हा स्विमींग पूल नाही. या पाण्याचा तुम्हाला अनुभव नाही. या मुलांचा मृतदेह पाहिला तेव्हा त्याने बनियन व जीन्स घातलेली होती. म्हणजे जेव्हा तो बुडत असेल तेव्हा अशा कपड्यांमुळे हालचाली करण्याला मर्यादा येतात. व आनंदाचा क्षण दुःखमय होतो . मित्र परिवार, आई वडीलांचे हाल हाल होतात. दुःखाचा डोंगर कोसळतो त्यांच्यावर. त्या आई वडीलांचा विचार करा.
साहित्याची जमवाजमव केली निघता निघता तीन वाजले . टिम पण जास्त पाहिजे म्हणून दोन वाहनांची व्यवस्था केली. प्लस व्हॅलीत कोणी मदतीला आले तर ठिक नाहीतर आपल्याला सर्व करावे लागते . खाली दरीत उतरून गेल्यावर कोणाचाही संपर्क होत नाही काही निरोप असेल तर वर जाऊन सांगायला लागतो . आम्ही स्ट्रॉंग टिम घेऊन निघालो होतो. साडे पाच वाजता ताम्हिणी घाटात पोचलो अभयारण्य असल्याने तेथे गेट उघडून आत गाडी पार्क केली.
आधीच्या अनुभवातून काम सोपे कसे होईल त्यासाठी काही जागा शोधून टेक्निकल रेस्कु करता येईल का ते बघत होतो. नवीन जागा सापडली तर नवीन ठिकाणी सेट अप लावायचा होता . नाही तर जुन्या ठिकाणी सेट अप लावायचा असे ठरले.
उशीर झाला असल्याने एक टिम महेश भाऊ मसनेच्या नेतृत्वाखाली खाली दरीत उतरून मिल्की बार धबधब्याकडे रवाना झाली .अरुंद वाट, एक बाजूने कडा व निसरडा उतार, हवेचा दाब वाढलेला त्यांच्या बरोबर सागर कुंभार, योगेश दळवी, सागर दळवी, आंनद शिर्के, असे खंदे कार्यकर्ते होते हर्षल चौधरी, गौरव कालेकर, सिध्देश निसाळ, कुणाल कडु , वरुन भागवत हे तरुण तडफदार कार्यकर्ते पण होते
आणि वर सचिन गायकवाड सरांच्या नेतृत्वाखाली मिहिर जाधव, ओंकार पडवळ, सुनिल गायकवाड, आनंद गावडे सर काही जागेचा शोध घेत होतो . पाऊस चालू झाला होता, पावसाचा आनंद घेण्यासाठी काही लोकांनी रेनकोट सुध्दा आणले नव्हते. धुक्याच्या लोट दरीतून बाहेर पडत होते. हवेत गारवा होता, खुप वेळाने वातावरण मोकळे होत होते. काही जागा पाहिल्यानंतर परत पहिल्या जागेवर निघालो. साडे सात वाजले होते अंधार पडला होता सेट अप लावला व रोप खाली सोडला मिहिर जाधव रोपच्या साहाय्याने खाली गेला. व नंतर खालच्या टिमला सामील होणार होता . खालची टिम अखंड अडचणीतून खाली उतरून गेली होती पाण्यातून दोन तीन वेळा वाटा क्रॉस करून जात होत्या. दगड गोटे आता चिकट झाले होते. पाण्याचा अंदाज घेत घेत टिम मिल्कीबार धबधब्याजवळ पोचली , मृतदेह व्यवस्थित पॅक करून घेतला. व परतीचा प्रवास चालू झाला. साडे सात वाजले होते. पावसाची रिपरिप चालू होती धुके आलेले होते पावसामुळे पाणी चांगलेच वाढलेले होते. स्वतःला चालणे जिथे अवघड असते अशा ठिकाणाहून मृतदेह उचलून आणायचा म्हणजे कसरतच होती . यासाठी शारीरिक तयारी बरोबर मानसिक तयारीही लागते. एकदा प्लस व्हॅलीत काम केलेले काही लोक परत मदतीसाठी येत नाहित. कारण खुप दमायला होते शारीरिक क्षमतेचा कस लागतो .
अंधार पडला होता टॉर्च च्या उजेडात व जंगलात वाट शोधता शोधता सगळ्यांची वाट लागलेली असते. निसर्ग, जंगलात वाट चुकने हे होतेच . परत वाट शोधून वाटेवर लागायचे .परत येताना थ्री लेअर धबधबा लागतो. व नंतर वर येणारी अरुंद निसरडी वाट डावी कडे उंच कडा व त्याच्या पायथ्याशी असणाऱ्या या वाटेनेच जावे व यावे लागते. रोहा आपत्कालीन पथक मदतीसाठी पोचले तरुण कार्यकर्ते खाली जाऊन या वळणावर खालील टिमला भेटले. नव्या दमाच्या फौजेचा चांगला फायदा झाला. वर खडी चढाईच्या वेळी टिम मदतीसाठी पोचली होती. सगळ्यांनी मिळून मृतदेह दोरीच्या जवळ आणला दोरीला जोडून टिम बाजूला झाली. वॉकी वर बोलून वर ओढायला सुरुवात झाली. या सेट अप मुळे अवघड भागात मृतदेह उचलून आणावा लागत नाही. काम थोडे सोपे होते.
वरच्या टिम बरोबर अभयारण्य कर्मचारी, वन अधिकारी, पोलीस पाटील कोकरे , व मृतांचे नातेवाईक असे मदतीला होते. दोरी ओढून वर घेतली व काही अंतर परत पायी चालून मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला.
ॲम्बूलन्स बरोबर मुळशी आपत्ती व्यवस्थापन चे प्रमोद भाऊ बलकवडे, पाटणूसचे रायगड आपत्ती व्यवस्थापनचे शेलार मामा ,केळी वडापाव घेऊन आले होते. रोहा आपत्कालीन पथक, गिरीप्रेमी संस्थेचे सदस्य या शोधमोहिमेत सामील झाले होते.
पोलिस कर्मचारी महेशजी पवार साहेब यांची या भागात नेहमीच खुप मदत होते.
रात्री साडे अकरा वाजता मोहिम संपली कार्यकर्ते भुकेने व्याकूळ झाले होते. हॉटेल प्लस व्हॅली येथे जेवणाची व्यवस्था केली होती. तिथे जाऊन जेवण केले व परत पहाटे तीन वाजता सर्व टीम सुखरूप लोणावळ्याला पोचलो.
आजची टीम 27/06/2024
सचिन गायकवाड सर , मिहिर जाधव ,वरुण भागवत
ओंकार पडवळ, आनंद गावडे सर , सागर कुंभार , कुणाल कडु सागर दळवी , आनंद शिर्के, योगेश दळवी, गौरव कालेकर
हर्षल चौधरी , सिध्देश निसाळ , महेश मसणे, सुनिल गायकवाड
शिवदुर्ग मित्र लोणावळा रेस्कु टिम
9822500884