वीडियो न्यूज़ — अंबरनाथ खड्ड्यांचे वाढले साम्राज्य रिक्षा चालक मालक आक्रमक वेळीच खड्डे न बुजवल्यास करणार आंदोलन

अंबरनाथ खड्ड्यांचे वाढले साम्राज्य रिक्षा चालक मालक आक्रमक वेळीच खड्डे न बुजवल्यास करणार आंदोलन

आयडियल इंडिया न्यूज
रिपोर्टर आशिष देशपांडे अंबरनाथ मुंबई

https://youtu.be/aUiBMdQiZd0?si=_XGsfJumkOSPTv00

 

वीडियो देखें

अंबरनाथ शहरातील पूर्व भागातील रस्त्यांचे ठेके घेणाऱ्या ठेकेदारांनी सिमेंट काँक्रीटचे रस्ते अर्धवट सोडले असून सोडलेल्या जागी डांबरी करण केले होते परंतु पावसाच्या पहिल्याच दिवशी डांबरीकरण चा रस्ता वाहून गेला असताना नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी ह्या गोष्टी कडे कानाडोळा केल्याचे दिसून येत असून आज पावसाळा सुरू होऊन दिड महिना होत आला असताना वाहन चालकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.अंबरनाथ एमआयडीसी हायवे येथील हा रस्ता असून आजूबाजूचा रस्ता सुद्धा खडामय झाला आहे .

अंबरनाथ शहरातील एमआयडीसी हायवे रोड येथून सतत छोट्या मोठया वाहनांची कायम वर्दळ सुरू असते आता पावसाचे दिवस असल्याने रस्त्याच्या मधोमध अनेक छोटे मोठे महा भयंकर असे खड्डे पडले असून सतत पडत असणार्या पावसामुळे काही खड्डे पाण्या खाली झाकून गेल्या मुळे पाण्यातील खड्यांचा अंदाज वाहन चालकांना येत नसल्याने काही वाहन चालकांचे हाऊजींग तुटले, तर काहींचे टायर फुटले , तर काही टू व्हीलर गाडी जागीच पलटी झाल्याच्या घटना घडल्या आहेत अंबरनाथ शहरातील प्रवासी वर्गाचे नसीब बलवंतर कोणत्याही प्रकारची अद्याप भयंकर दुर्घटना घडली नसली तरी वेळीच रस्त्यावर योग्य उपाययोजना न केल्यास येणाऱ्या पुढील काळात एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही .
अंबरनाथ शहरातील रिक्षा चालक मालक यांनी आक्रमक भूमिका घेतली असून वेळीच रस्त्यावर योग्य उपाययोजना न केल्यास दि.20 जुलै 2024 रोजी आनंद नगर एमआयडीसी येथे जाणाऱ्या सर्व रिक्षा एक दिवसीय बंद ठेवण्यात येतील अशी माहिती रिक्षा चालक मालक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed